१९८० साली सौ.स्मिता कुलकर्णी यांनी
वधू वर सूचक म्हणून कामाची सुरुवात केली. शेजारी राहणाऱ्या एका मुलीच्या विवाहासाठी
तिचे आई-बाबा स्थळे पहात होते. या कामात सौ.स्मिता कुलकर्णी त्यांना मदत करू लागल्या.
उत्तम वक्तृत्व व आपुलकीने बोलण्यामुळे स्थळे पाहताना आपोआप ओळखी वाढू लागल्या व स्थळांची
माहिती संकलित होऊ लागली. तसेच आसपासचे लोक स्थळांची माहिती विचारण्यासाठी येवू लागले.
अशा प्रकारे सुयोग वधु वर सूचकच्या कामाची सुरुवात झाली....
आपुलकी व विश्वसनीय सेवेमुळे लवकरच सुयोगचा भराभर विस्तार होऊ लागला. परमेश्वर कृपेने
भरपूर विवाह जुळवण्यात सुयोगला यश येऊ लागले. अल्पशिक्षित पासून उच्चशिक्षितांपर्यंत,
प्रथम वर-वधू, घटस्फोटीत तसेच विधवा, विधूर पुनर्विवाहेच्छुक, व्यंग असलेले अश्या सर्व
प्रकारच्या विवाहेच्छु वधू-वरांची नोंद होऊ लागली. सौ. स्मिता कुलकर्णी तळमळीने कार्य
करीत असलेने व प्रत्येक विवाह जमवण्यासाठी भरपूर श्रम घेत असलेने दरवर्षी भरपूर विवाह
जमून 'यशस्वी' वधू-वर सूचक अशी ख्याती झाली. प्रत्येक सभासदाला अनुरूप अशीच स्थळे सुचविणे
ही सुयोगची खासियत. वृत्तपत्रे व आकाशवाणीवर या कार्याची दखल घेतली गेली. फक्त सांगली,
सातारा, कोल्हापुरच नव्हे तर सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड परिसर, पुणे - मुंबई,
नाशिक विभाग, तसेच कोकण व कर्नाटकातूनही सभासद होऊन सर्व विभागात सुयोगने जनमानसात
स्थान मिळवले. आजपर्यंत अक्षरश: हजारो विवाह जमवण्यात सुयोगची मोलाची मदत झाली आहे.
इतकेच काय पण सुयोगच्या सुरुवातीच्या काळात विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांनी पुढील पिढीच्या
विवाहासाठी सुद्धा सर्वप्रथम सुयोगलाच पसंती देऊन आवर्जुन नोंद करीत आहेत. याचा आम्हाला
सार्थ अभिमान आहे. कालमानाप्रमाणे सुयोगनेही आधुनिक रूप धारण करून नव्या पिढीशी संवाद
साधण्यासाठी वेबसाइटचा स्वीकार केला आहे. व आमची नवीन वेबसाईट www.vivahsuyog.com
सादर करताना आम्हास अतिशय आनंद होत आहे. सौ.स्मिता कुलकर्णी यांना आता पती श्री
रमेश कुलकर्णी व सूनबाई सौ. सानिका हृषीकेश कुलकर्णी यांचेही सहाय्य होत आहे. आजपर्यंत
आपण सुयोग वधू वर सूचकला भरभरून प्रेम व आशीर्वाद दिले आहेत. असेच प्रेम व सहकार्य
आमचे नवीन उपक्रमास द्याल याची खात्री वाटते. आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने व
आपल्या प्रचंड प्रतिसादाने याही उपक्रमास उदंड यश मिळावे हीच अपेक्षा.
-
सौ. सानिका हृषिकेश कुलकर्णी
सहसंचालिका
-
श्री. रमेश र. कुलकर्णी
व्यवस्थापक
-
सौ. स्मिता कुलकर्णी
संचालिका